नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. गडकरी यांच्या कार्यालयात फोन वाजला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. महाराष्ट्रातील नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळील जनसं पर्क कार्यालयात आज सकाळी तीन धमकीचे फोन आले आहेत. हा कॉल दुसऱ्यांदा आला आहे. याआधीही जानेवारी महिन्यात जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली होती. आज ही माहिती मिळताच पोलीस विभागाने पुन्हा पोलीस जनसंपर्क कार्यालय गाठून तपास सुरू केला. यावेळीही बेळगाव कारागृहातील आरोपी जयेश कंठा याच्या नावाचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपास करत आहेत.
आज २१ मार्च सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलप्रकरणी त्यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी
जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना या पूर्वीही नागपूरच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. खर तंर तो हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवाय त्यानं जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेकवेळा या अगोदरही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. यापूर्वी २०१६ मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता.