मुंबईः मागील तीन दिवसांपासून राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन दिलेलं आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने अशी जुनी पेन्शन योजना व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
दरम्यान, संपकरी आणि सरकार यांच्यामध्ये तोडगा निघालेला नसला तरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. नवीन पेन्शन योजनेमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली असल्याची माहिती आहे.हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
नवीन पेन्शन योजनेमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्याचं मृत्यू योगदान देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती असून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
नेमकं निवृत्ती वेतन कसं आणि किती मिळणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबते वृत्त दिले आहे. सरकारकडून संपकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संपकरी काय निर्णय घेतात, हे कळेलच.