
प्रतिनिधी- विनोद चव्हाण
विठ्ठल नामाचा गजराने संपूर्ण नालासोपारा दुमदुमला! हरिनामाचा वारसा जपणारे ब्रह्मानंद भजन मंडळ विरार या भजन मंडळा तर्फे भव्यदिव्य रेल्वे प्रवसी भजन स्पर्धेचे आयोजन साईछाया विद्यालय मोरेगाव, नालासोपारा पूर्व येथे करण्यात आले. पश्चिम, मध्ये विभाग आणि हार्बर विभाग मधील निवडक बत्तीस भजन मंडळीनी सहभाग घेतला होता.

ब्रह्मानंद भजन मंडळ विरार आणि सिता राम संजिवनी आनंदाश्रम वृध्दाश्रम सिंधुदुर्ग यांच्या तर्फे भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा नालासोपारा पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन नंतर पंचपदी करूण स्पर्धा आरंभ केली गेली. वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तीमत्व ज्यांची ख्याती मुंबई सह महाराष्ट्र मध्ये आहे. असे वै. ह. भ. प. श्री रामदास महाराज पोटे यांचे दोन्ही चिरंजीव तबला वादक, प्रवचनकार ह. भ. प श्री विनायक रामदास महाराज पोटे वडिलांची रित सांभाळत भजन व निरूपण करणारे गायक ह भ प. श्री सचिन रामदासमहाराज पोटे हे या भजन स्पर्धेत परिक्षक म्हणून लाभले. स्पर्धेचे सुत्रसंचालन ह. भ. प. श्री दिनेश महाराज गायकर यांनी उत्तम रित्या केले. तसेच मंडळाचे प्रमुख श्री विठ्ठल मयेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व वारकरी परंपरा जपण्याचे काम हे मंडळ करित आहे. तुम्ही जेथे असाल तेथे नामचिंतनाचा उघड उघड प्रसार करा. मग तुम्हांला बंधनातून विठ्ठल परमात्मा निश्चित सोडवील. कोणीही भजन, कीर्तन म्हणजे हरी चिंतन करणारा असो तो कुठल्याही प्रकरचे गुण व दोष पाहत नाही त्याला प्रेमाने आळविले म्हणजे तो आपला अंकित होतो असे तुकाराम महाराज म्हणतात या हरी कीर्तना मध्ये इतके प्रेम आहे कि हा प्रपंच कडू वाटू लागतो व भजन आणि कीर्तन ऐकल्यावर अंगावर रोमांच उठतात त्यामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होऊन कंठ दाटून येतो.
भजन स्पर्धाच निकाल जाहीर करण्यात आला उत्कृष्ट चकवा वादक सन्मानचिन्ह साई सेवा भजन मंडळ जीवेश सलवादी, उत्कृष्ट डफली वादक सन्मानचिन्ह ओम साई भजन मंडळ अरुण कोकाटे, उत्कृष्ट रिदम वादक सन्मानचिन्ह नवतरुण भजन मंडळ नारायण साळुंखे, उत्कृष्ट कोरस सन्मानचिन्ह ओम साई भजन मंडळ भारत सोलकर, उत्कृष्ट गायक सन्मानचिन्ह हेरंब भजन मंडळ आनंद शेनॉय, उत्कृष्ट डफली द्वितीय हरिभक्त भजन मंडळ संजय रसाळ, लक्षवेधी प्रथम सन्मानचिन्ह छंद हरिनामाचा संजय मिरगुळे, लक्षवेधी द्वितीय सन्मानचिन्ह ज्योतिर्लिंग ओंकार आत्माराम सुर्वे, लक्षवेधी तृतीय सन्मानचिन्ह ओमकार भजन मंडळ विजय शिवगण, सांघिक सहावा आणि सन्मानचिन्ह सचिदानंद भजन मंडळ प्रवीण पांढरे, सांघिक पाचवा सन्मानचिन्ह माऊली कृपा भजन मंडळ शंकर कदम, सांघिक चतुर्थ सन्मानचिन्ह साई सेवा भजन मंडळ जीवेश सलवादी, सांघिक तृतीया आणि सन्मानचिन्ह दत्त साई भजन मंडळ प्रमोद कुळये, सांघिक तृतीय सन्मान चिन्ह छत्रपती शिवराय अनिल मोरे, सांघिक प्रथम आणि सन्मानचिन्ह आई जीवदानी भजन मंडळ दर्शन नवाळे यांना देण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णू तेली, उपाध्यक्ष श्री राजाराम नेमन, कार्याध्यक्ष ह. भ. प. राहुल जाधव सचिव हेमंत खोत उपसचिव रामचंद्र कलंबटे खजिनदार श्री सुभाष सुर्वे उप खजिनदार संदेश गागंण. दिनेश शिंदे, श्री सुभाष बाणे सदस्य मारूती गार्डी, विजय काकये, राम कोकरे, रूपेश शिंदे, ह. भ. प. प्रतिक आडीवरेकर, सुधीर भुवड, सुनील मांजरे इत्यादी सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

सिताराम संजिवनी आनंदाश्रम वृध्दाश्रम तर्फे समाज मित्र पुरस्कार श्री जयराम पवार व आनंद मित्र पुरस्कार श्री. शिवाजी पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी श्री. संत सेवा भजन सामाजिक संस्था पश्चिम चे अध्यक्ष श्री वसंत प्रभू व संत ज्ञानेश्वर माऊली सामाजिक संस्था चे अध्यक्ष ह. भ. प. श्री हनुमंत तावरे महाराज आणि श्री. संत सेवा समिती ची सर्व कार्यकारिणी मान्यवर म्हणून उपस्थित होते. सदर भजन स्पर्धा सिताराम संजिवनी आनंदाश्रम वृध्दाश्रम यांच्या मदत निधी करिता पार पाडली गेली. शेवटी आश्रमासाठी योगदान केलेल्या सर्व मंडळीचे आभार मानण्यात आले.
जाहिरात
