नवानगर (माटवण) दापोली येथे बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

Spread the love

दापोली तालुक्यातील अनेक नामवंत संघांनी घेतला सहभाग

दापोली(प्रसाद महाडिक/शांताराम गुडेकर ) युवा प्रतिष्ठान नवानगरच्या वतीनं नुकतंच नवानगर येथे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. स्वर्गीय अविराज (बंटी) महाडीक यांच्या स्मरणार्थ हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन अविराज (बंटी) महाडीक यांचे वडिल श्री. विजय महाडीक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी श्री.गणपत महाडीक,श्री.हरिश्चंद्र महाडीक,श्री. विनायक महाडिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामन्यात दोस्ती फायटर कांगवई या संघानं वळवणवाडी या संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं.दत्तकृपा पिसई या संघानं तृतीय पारितोषिक पटकावलं.स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून दत्तकृपा पिसई संघाच्या वेदांतची तर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वळवणवाडी संघाच्या आदीलची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान दोस्ती फायटर कांगवई या संघाच्या अक्षय रुके याने पटकावला.या स्पर्धेसाठी ग्लोबल सनशाईनचे सुरज माटे, ग्रीष्म जनार्दन माने आणि समाजसेवक सुधीर कदम यांचे मोलाचं सहकार्य लाभलं.हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अक्षय महाडिक,नितीन चव्हाण, शुभम महाडिक आणि युवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी नवानगरच्या ग्रामस्थांचंही खूप सहकार्य लाभले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page