रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्ग ३० महिन्यात पूर्ण करून देखभाल दुरूस्ती करण्याचा करार असतानाही तब्बल ४० महिने लोटूनही दोन्ही भुयारी मार्ग अपूर्णावस्थेतच आहेत. या दरम्यान ठेकेधारक कंपनीने भरलेल्या निवेदेची तुलनात्मक किंमत वाढून कामावरील खर्चही वाढणार आहे. भुयाराचे काम वाजवीपेक्षा अधिक काळ म्हणजेच अजून १० महिने तरी रेंगाळणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याच्या कामाचा ठेका रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतला असून यासाठी ४४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तालुक्यातील खवटी येथून २०१९ च्या पावसाळ्यापूर्वीच खेड व पोलादपूरदरम्यान दोन भुयारीमार्ग निर्माण करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत एनएडीपी ४ मंत्रालयांतर्गत येणार्या आयोगाने हा प्रकल्प ३० महिन्यात पूर्ण करण्याचे सूचित केले आहे. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र वापरण्यात आले असून याद्वारे ३ ते ४ मीटर लांबीचे कातळ फोडले जात होते. २० मीटर रूंदी व ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग झाला आहे.
भुयारी मार्गात आवश्यक ठिकाणी सुरूंग स्फोटासाठी जिलेटीनचा वापर केला जात असून भुयारात पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढळ्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. कशेडी घाटातील प्रस्तावित भोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवताना तीनपदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार ७२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा रस्ताही प्रस्तावित असून रस्त्याचे कामही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६