
▪️पंढरपूरच्या विठ्ठल आणि रूक्मिणी मंदिरात पहाटे होणाऱ्या एकमेव नित्यपूजेसाठी 2024 या कॅलेंडर वर्षातील सर्व बुकिंग्स आत्ताच फुल झाल्या आहेत. त्यामध्ये विठ्ठल मंदिराला 75 लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला 33 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. जर भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचं बुकिंग करून विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी 11 हजार रूपयांची रक्कम भरणे आवश्यक असते. त्यानुसार त्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळून दहा ते बारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो.