*संगमेश्वर-* संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी येथील समशानभूमीकडे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी स्वखर्चातून रस्ता तयार करून देत वचनपूर्ती केली. सोमवारी या रस्त्याचे उदघाटन प्रशांत यादव यांच्याहस्ते करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड अडचण येत होती. येथे रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने मागणी व पाठपुरावा केला मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासमोर ग्रामस्थांनी ही समस्या मांडली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ग्रामस्थांना रस्त्यासाठी शब्द दिला होता.फक्त शब्दच दिला नव्हे तर वाशिष्ठी प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याचे काम देखील सुरू केले होते.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी रस्त्याचे उदघाटन तसेच नामकरण सोहळा प्रशांत यादव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत,शिवसेना तालुका संपर्क सचिव प्रकाश दुदम, राष्ट्रवादी सेवादल जिल्हाध्यक्ष अनवर जबले, नंदकुमार फडकले, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिताली कडवईकर,अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष असीम मोडक, सौ.सरिता चव्हाण, मनोज शिंदे, जेष्ठ शिवसैनिक राणे बुवा, शिवसैनिक चंद्रकांत दादा जाधव, उदय चाचे, प्रथमेश शिंदे, राजू घोसाळकर, शिवराम म्हादगे, मारुती किंजळकर, ग्रा. प सदस्य सोमा म्हादगे, शांताराम सुर्वे, राजुशेठ ब्रीद, शेखर जोगळे, राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष सुनील कर्वे, संतोष सुर्वे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष सचिन जाधव, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव,अनिसभाई खान आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी प्रशांत यादव यांचे जल्लोषी स्वागत करून जोरदार घोषणाबाजी केली.सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आशा शब्दात उपस्थितांनी प्रशांत यादव यांचा गौरव करून सत्कार केला.तसेच वर्षानुवर्षाची समस्या प्रशांत यादव यांनी काही दिवसात मार्गी लावल्याने पाटीलवाडीकडून त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले.तसेच यापुढे पूर्ण ताकदीने प्रशांत यादव यांच्या पाठी उभे राहणार असल्याची ग्वाही देखील ग्रामस्थांनी दिली.
*फक्त हाक मारा…..प्रशांत यादव*
समस्या कोणतीही असुदे फक्त एकदा हाक मारा,पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठी उभा राहीन,तुम्ही जे जिवाभावाचे नाते निर्माण केलेत त्याला आता अंतर देणार नाही.येथील समस्या बघताच मी शब्द दिला होता.तो आज पूर्ण केला आहे.यापुढे देखील सदैव आपल्यासाठी काम करत राहणार आहे.असा शब्द देतानाच आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम ठेवा,असे आवाहन प्रशांत यादव यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.