
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथील शेतजमिनीचा फेरफार बनवून घेण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपाई या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी या तिघांना ताब्यात घेण्यात घेवून त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेली शेत जमीन आहे. या जमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उत्तारा संबंधीत मंडळ अधिकारी व तलाठी यांचेकडुन करुन देतो असे शिपाई मारुती भोसले याने सांगितले. याकामी यांनी तक्रारदार यांचेकडुन ५० हजार रुपयांची मागणी केली. या रक्कमे पैकी मारुती भोसले याने ४५ हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. परंतु या जागे विषयीची फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रदद केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अमित शिवगण, मंडळ अधिकारी म्हाप्रळ, श्रीनिवास श्रीरामे, तलाठी सजा म्हाप्रळ अतिरिक्त कार्यभार सोवेली व मारुती भोसले शिपाई उपकोषागार कार्यालय, मंडणगड यांची समक्ष भेट घेतली. त्यावेळी फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी शिगवण यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ही रक्कम त्यांना दिली आणि ते जाळ्यात सापडले. या लाचप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रत्नागिरी लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपअधीक्षक अविनाश पाटील, पाेलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पाेलिस फाैजदार उदय चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक अबिकर, काॅन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनवडे यांनी केली.
मंडणगाव तालुक्यातील शेनाळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने धाड टाकून मंडल अधिकारी, ग्रामसेवकासह एका महसूल कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. या महसूल कर्मचार्यांना शेतकऱ्याकडून तब्बल 30 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल्याने तालुका महसूल प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे. 27 मे रोजी सांयकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी (अतिरिक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून संबंधित सातबारा उतारा करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले या शिपायाने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे भोसले यांनी तक्रारदाराकडून 45 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले आहेत. मात्र, तरीही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केली. त्यानंतर, तक्रारदाराने 27 मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्यासमक्ष भेट घेतली. तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे पुन्हा 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी, ही रक्कम देताना एसीबीने कारवाई करत रंगेहात अटक केली.
मंडळ अधिकारी शिगवण याने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15,500 स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला. त्यामुळे, महसूल विभागाने कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यास लाच घेताना अटक..
दरम्यान, महसूल विभागात सर्वसामान्यांना सातत्याने पैशाची मागणी केली जाते, कुठलेही काम करण्यासाठी पैसाच द्यावा लागतो अशी ओरड कायम असते. विशेष म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका निवासी उपजिल्हाधिकाऱ्यास एसीबीने रंगेहात अटक केली. या महाशयांनी तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी, 23 लाख रुपये त्यांना पोहोचलेही होते. अखेर, 5 लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.