
तब्बल १३५० रक्तदात्यांनी केले रक्तदान
मुंबई (शांताराम गुडेकर )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक-१ च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दिवसभरात तब्बल १३५० रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केला. सकाळपासूनच नागरिकांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली होती.शिवसेना आमदार विलास पोतनीस,विभागप्रमुख उद्देश पाटेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.शिवसेना नेते सुभाष देसाई,उपनेते विनोद घोसाळकर,उपनेत्या संजना घाडी यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी बोरीवली ब्लड बँक बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर,बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख श्री.दामोदर म्हात्रे श्री. सुनील पाटील श्री.अशोक सोनवणे सौ.वंदना खाडे सौ.जयश्री बंगेराज सौ.स्नेहल पलांडे सुविधा गवस विधानसभा समन्वय श्री.शैलेश शहा श्री.अंकुश भाईजे शाखाप्रमुख श्री.सचिन म्हात्रे श्री.सागर सरफरे व म.शाखा संघटक प्रियंका करलकर सौ.वंदना नार्वेकर कार्यालय प्रमुख श्री.चंद्रकांत भालेकर शाखा समन्वयक श्री.बबन सावंत श्री.संजय पवार व शाखा समन्वयक सौ.चैताली तावडे व युवा सेना यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.