नेरळ बाजारपेठातील डेअरीमध्ये स्फोट, बंद डेअरीचे शटर उडून १० फुटावर पडले, डेअरीतील सामानाचे मोठे नुकसान..

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर

            नेरळ बाजारपेठातील वरचा भाग असलेल्या टेपआळी येथील एका डेअरीच्या दुकानात आज पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामुळे दुकानातील सामानासह डेअरीचे शटर हे सुमारे १० फुटांवर तुटून उडाले. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दुकानातीळ सामानासह दुकानाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर माहिती मिळताच नेरळ ग्रामपंचायतचे आपत्कालीन व्यवस्थेचे मंगेश इरमाले यांच्यसह नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान हा स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.             नेरळ बाजारपेठातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्गावर अनेक छोटीमोठी दुकाने आहेत. टेपआळी परिसर असलेल्या या ठिकाणी अंबरनाथ जय हिंद बँकेजवळ श्री भैरवनाथ डेअरी हे दुकान आहे. डेअरी असल्याने फ्रिजसह बेकरीचे अनेक पदार्थ या दुकानात विक्रीसाठी असतात. डेअरीचे मालक कैलास डांगि हे नेहमीप्रमाणे दिनांक १ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून निघून गेले. मात्र आज दिनांक ०२ जुलै रोजी पहाटे ४.४५ च्या सुमारास श्री भैरवनाथ डेअरी या दुकानातून कसलातरी स्फोट होऊन सामानासह शटर तुटून थेट १० फुटांवर उडाले हि घटना अंबरनाथ जय हिंद बँकेच्या एटीएममध्ये असलेल्या सुरक्षारक्षक यांनी पहिली. त्यामुळे त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी व आपत्कालीन विभागाचे मंगेश इरमाले यांना कळवली. घटनेची माहिती मिळताच इरमाले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत डेअरीचे मालक,  नेरळ पोलीस यांना घटनेची माहिती देऊन रस्त्यावरील अपघातजनक सामान बाजूला केले. तसेच मालक कैलास यांनी दुकानात येत अस्ताव्यस्त सामान गोळा केले. दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आतमध्ये गॅस निर्माण झाला तसेच त्यामुळे स्फोट झाला असेल असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.             नेरळ हे  शहरीकरणाकडे झुकले आहे. त्यामुळे रस्त्यावर कायम रहदारी असते. मात्र आज रविवार त्यात गेले काही दिवस पाऊस संततधार कोसळत असल्याने रस्त्यावर रहदारी नव्हती त्यामुळे सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुकानातील सगळं माल खराब झाला आहे. तर डेअरीचे मालक कैलास डांगी हे नुकतेच एका शस्त्रक्रियेतून बाहेर पडले असल्याने त्यांच्यासाठी हा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page