
संगमेश्वर :दि २२ जानेवारी- कडवई जिल्हा परिषद गटातून भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–आरपीआय (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपाचे विनोद म्हस्के यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनोद म्हस्के हे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदाचा अनुभव गाठीशी बांधला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देत आतापर्यंत अनेक कामे त्यांनी मार्गी लावली असून, पुढेही समाजहित लक्षात घेऊन विकासात्मक कामे सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
अर्ज दाखल प्रसंगी शिवसेना पक्षाचे नेते श्री. राजेंद्र महाडिक, श्री. राजेंद्र सुर्वे, श्री. राजेंद्र पोमेंडकर, श्री. दत्ताराम लिंगायत, श्री. दिलीप सावंत, श्री. वसंत उजगावकर, श्री. अमितजी ताठरे, श्री. अविनाश गुरव, श्री. संदेश घाडगे, श्री. दत्ताजी ओकटे, श्री. दिनेश मालप, श्री. संतोष गुरव, श्री. स्वप्नील सुर्वे, सौ. राजश्री कदम तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवत झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे कडवई गटातील निवडणूक वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*