भाजपचे प्रकाश शिगवण राष्ट्रवादीत ….

Spread the love

*मंडणगड :*  लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी कोलाड येथे झालेल्या कार्यक्रमात स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केला.
   

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, स. तु. कदम, महेश केकाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी, संदीप राजपूरे, तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, हरेष मर्चडे, सतीष दिवेकर, प्रकाश भुवड, पराग करमरकर आदी उपस्थित होते.
   

यावेळी प्रकाश शिगवण, यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मंडणगड तालुका अध्यक्ष सुभाष सापटे, उपाध्यक्ष फौरोज, उक्ये, अरुण घोसाळकर, हसरत खोपटकर, दिनेश साखरे, सुभाष शिगवण, माजी सरपंच शुभांगी शिगवण, शंकर खेराडे, गणेश सावर्डेकर, पुंडलीक सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वगृही प्रवेश केला. या वेळी स्वागत समारभांत खासदार सुनील तटकरे म्हणाले की, मुळ पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही फारकत न घेता गेल्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page