चिपळूण: प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीदेखिल भारतीय जनता पार्टी चिपळूणतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बाहेरील मैदानावर ही स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाली. येथील दहीहंडी फोडण्याचा बहुमान खेर्डीच्या जय हनुमान गोविंदा पथक शिगवणवाडीला मिळाला. दुपारी येथील दहीहंडी उत्सवाचे श्रीफळ वाढवून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या विशेष निमंत्रित सदस्या नीलम गोंधळी यांची विशेष उपस्थिती होती.
या दहीहंडी उत्सवाला एकूण १३ गोविंदा पथकांनी सलामी दिली. या स्पर्धेत विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली. प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकालादेखिल येथे बक्षीस ठेवण्यात आले होते. टीडब्लूजे फाऊंडेशनतर्फे या वेळी उपस्थित प्रत्येक गोविंदा पथकाला सुरक्षा कीट देण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेची व डॉक्टरांसह वैद्यकीय टीमची व्यवस्थादेखिल करण्यात आली होती. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश हा उपक्रम येथे प्रत्येक गोविंदा पथकाबरोबर साजरा करण्यात आला. गोविंद पथकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, मिलिंद कापडी, महमद फकीर, किशोर रेडीज, चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, भगवान कोकरे महाराज, पूर्वा चव्हाण, समीर हेलेकर, अरूण भोजने, पुष्कर चव्हाण, राष्ट्रवादीचे दशरथ दाभोळकर, दिशा दाभोळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धेच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम यांनी केले.
भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर व शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्पर्धेला भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे, रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, गुहागर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजप खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, गुहागर भाजप सरचिटणीस सचिन ओक, खेर्डीचे उपसरपंच विनोद भुरण, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदेश ओक, जिल्हा चिटणीस वैशाली निमकर, कामगार मोर्चा जिल्हा संयोजक विनोद कदम, युवा मोर्चा पदाधिकारी प्रणय वाडकर, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे, चिपळूण अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, साईनाथ कपडेकर, तालुका पदाधिकारी संदेश शेलार, शहर सरचिटणीस श्रीराम शिंदे, मधुकर निमकर, शहर चिटणीस विनायक वरवडेकर, गणेश हळदे, स्वानंद रानडे, राकेश घोरपडे, सचिन शिंदे, अमित चिपळूकर, निखिल किल्लेकर, संदेश भालेकर, साहील ताम्हणकर, शैलेश लब्धे, उल्हास भोसले, शितल रानडे, अमेय सुर्वे, दर्शन महाडिक, अजित गुरसळे, देवेंद्र रेडीज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.