भाजपाची चिंता वाढली,. आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली…

Spread the love

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकीकडे इंडिया आघाडी भाजपाविरोधात मजबूत होताना दिसतेय तर दुसरीकडे भाजपाप्रणित एनडीएतून एक एक पक्ष बाहेर पडताना दिसत आहेत. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या विकासासाठी जनसेना आणि टीडीपी गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं.

   दरम्यान, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण हे आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर नाराज आहेत. पवन कल्याण 14 सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडूंना भेटण्यासाठी राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात गेले होते. यानंतर 18 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. मात्र आता त्यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

    पवन कल्याण यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला ५.६ टक्के मतदानासह १ जागेवर विजय मिळवण्यास यश आले होते. एनडीए मधून दोन पक्ष बाहेर पडल्याने भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे.

    पवण कल्याण यांच्या रुपाने भाजपने दक्षिणेतून आणखी एक मित्र गमावला आहे. यापूर्वी अण्णाद्रमुक, देसिय मुर्पोक्कु द्रविड कळगम, जनाधिपथ्य राष्ट्रीय सभा या दक्षिणेतील पक्षाने भाजपची साथ सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप दक्षिणेत पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच एक एक पक्ष त्यांची साथ सोडताना दिसत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page