रत्नागिरी- भाजपा प्रदेश चिटणीस व सोशल मीडियाy प्रभारी श्वेता शालिनी या उद्या सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. बूथ सक्षमीकरण अंतर्गत सोशल मीडिया सेल अधिक प्रभावी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. रत्नागिरीमधील भाजपाच्या सोशल सेलची महत्वपूर्ण बैठक श्वेता शालिनी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
प्रमुख पदाधिकारी सोशल मीडिया संयोजक यांचे बरोबर भाजपा कार्यालयात सकाळी ११ वाजता ही महत्वपूर्ण बैठक होणार असून श्वेता शालिनी सोशल मीडिया प्रभावी करण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील. श्वेता शालिनी यासारख्या प्रदेशातील महत्वपूर्ण पदाधिकारी रत्नागिरीत येऊन बैठक घेत आहेत, याचे खूप महत्व आहे. सोशल मीडिया प्रभावी करण्यासाठी आवश्यक रचना तसेच मार्गदर्शन यातून कार्यकर्ते प्रभावी माध्यमाच्या वापरासाठी तयार व्हावेत म्हणून हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.