मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.तसा दावाही नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा असाच दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 14 तारखेला मोठा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप राज्याला बसणार आहे.
आम्ही बोलाची कढी करत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 14 तारखेला राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यांनी हा दावा करताना कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही.