जनशक्तीचा दबाव देवरुख | प्रतिनिधी ,ऑक्टोबर २१, २०२३.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात घोटाळे होणे हे काही नवीन नाही. मात्र गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक माध्यमे, प्रसार माध्यमे आणि व्यक्तिगत राजकीय टीकाटिप्पण्या करून ज्या पद्धतीने राज्यातील महायुती सरकारला बदनाम करण्याची कटकारस्थाने महाविकास आघाडीचे शिल्लक नेते आणि कार्यकर्ते करत होते त्यावर काल झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या वतीने पुराव्यांनिशी प्रहार करत विरोधकांच्या चिंधड्या उडवल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून शिवसेनेने तयार केलेला कंत्राटी भर्तीचा भस्मासूर महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या आशा-आकांक्षांना भस्म करण्यासाठी ज्या गतीने प्रयत्न करत होता त्यामुळे महाराष्ट्राची झालेली वाताहत देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली. आणि त्यातून महाराष्ट्रभर जनक्षोभ उसळला.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखसारख्या छोट्या शहरांत वर्षाकाठी ७-८ हजार विद्यार्थी पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१० पासून राबवलेल्या नीतीचा फटका बसल्याने जवळपास १४ वर्षे येथील तरुण-तरुणी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. करून-सवरून लोकांची दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या विरोधकांचा हा खेळ अखेर देवेंद्र फडणवीस यांनी संपवला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी, संगमेश्वरच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या निषेधार्थ देवरुख एस.टी. बस डेपोच्या परिसरात एकत्र जमून घोषणाबाजी केली. काँग्रेस-शरद पवार गट-शिल्लक सेना अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीबाबत सत्यपरिस्थितीचे कथन करणाऱ्या पत्रकांचे वाटप केले.
यावेळी भाजपा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजन कापडी, संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, सोशल मिडिया जिल्हा संयोजक श्री. अमोल गायकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. नागरिकांनीही घोषणाबाजीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, जिल्हा चिटणीस सौ. कोमल रहाटे, श्री. राकेश जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, माजी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, तालुका सरचिटणीस श्री. सचिन बांडागळे, श्री. रूपेश भागवत, श्री. यशवंत गोपाळ, श्री. मिथुन निकम, महिला मोर्चा संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्षा सौ. स्नेहा फाटक, महिला मोर्चा संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, युवा मोर्चा संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. प्रथमेश धामणस्कर, युवा मोर्चा संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री. स्वप्निल सुर्वे, रिक्षा संघटना देवरुख शहराध्यक्ष श्री. प्रमोद शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीकांत भागवत, तालुका कार्यकारिणी सदस्या सौ. प्राजक्ता घडशी, श्री. राहुल फाटक, श्री. अजिंक्यराज सुर्वे, श्री. शेखर गुरव, श्री. विनोद गुरव, श्री. अनंत पाताडे, श्री. स्वप्निल शिंदे, श्री. अविनाश गुरव, श्री. बावा कांबळे, श्री. दिनेश गुरव, सौ. शीतल पंडित, श्री. अमित रेवाळे, श्री. गणेश मोहिते, श्री. चेतन पाडळकर, श्री. देवदत्त भाट्ये, सौ. भारती राजवाडे, श्री. विजय (बाबू) गुरव, श्री. अल्तमश मालगुंडकर, श्री. अजिंक्य आंब्रे, श्री. शुभम पांचाळ, श्री. अक्षय शिंदे, श्री. स्वप्निल कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.