पिरंदवणे | डिसेंबर २३, २०२३-
संगमेश्वर तालुक्यातील खाडी भागातील पिरंदवणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नांना तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याची जोड मिळाली आणि आज गुरववाडी, पिरंदवणे येथील मोदी शासनाच्या घरकुल योजनेचे लाभार्थी कै. सदानंद हरिश्चंद्र गुरव यांच्या कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष प्रवेश केला. संगमेश्वर (उ.) चे तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. स्वप्निल सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी पक्षप्रवेश केल्यामुळे पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक काम करण्याचा निर्धार सौ. शीतल दिंडे यांनी व्यक्त केला. श्रीम. सुलोचना गुरव, श्री. विश्वास गुरव, सौ. वैदेही गुरव अशी पक्षप्रवेश करणाऱ्यांची नावे आहेत. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ. वैदेही गुरव म्हणाल्या, “मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी आमच्या कुटुंबाला आजपर्यंत सढळ मदत केली आहे. आम्हाला मोफत धान्य दिले, मोफत कोरोना प्रतिबंधक लस देऊन सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली, एस.टी. मध्ये मला अर्ध्या तिकिटात प्रवास करणे आता सोयीचे झाले आहे, मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश, वह्या-पुस्तके शासनच पुरवत आहे, कुटुंबाला ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मोदी साहेबांच्या गरीब कल्याण धोरणामुळेच मिळाले आहे. माझे सासरे हयात असताना त्यांना शेतकरी सन्मान योजनेचे वार्षिक ६००० रुपये मिळायचे. आता ते हयात नाहीत. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अधिकचे ६००० रुपये म्हणजे एकूण १२००० रुपये वर्षाला मिळतील. एवढं सगळं देणाऱ्या मोदीजींच्या सरकारने आम्हाला घरकुलसुद्धा दिले. मात्र काही कारणाने ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पण ते ही कधीतरी पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. या घरकुलासाठी माझ्या कुटुंबाला मदत करणाऱ्या मा. आमदार बाळासाहेब माने, तत्कालीन महिला तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे, महिला सरचिटणीस सौ. नुपूरा ताई मुळ्ये, श्री. अविनाश गुरव, आमचे मानकरी श्री. अरविंद मुळे यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज घर उभे झाले आहे. त्यामुळे इतके भरभरून देणाऱ्या मोदीजींच्या कार्यात सहभागी होण्याच्या हेतूने मी माझ्या कुटुंबासहीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत आहे. भविष्यात लोकांमध्ये मोदीजींच्या कामाबद्दल जागृती करून भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करेन.”
हा पक्ष प्रवेश करण्यापूर्वी भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांना माहिती देण्यात आली. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय (बापू) सुर्वे, तालुका उपाध्यक्ष श्री. प्रशांत रानडे, बूथ प्रमुख व गावचे मानकरी श्री. अरविंद मुळे यांनी उपस्थित राहून गुरव कुटुंबियांचे अभिनंदन व स्वागत केले.