भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली विघ्रवली बूथच्या कार्यकर्त्यांना भेट…

Spread the love

बूथ सशक्तीकरणासाठी दिला कानमंत्र.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर १२, २०२३.

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत महाविजय २०२४ च्या अनुषंगाने चिपळूण-संगमेश्वर विधानसभेत निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. सदर प्रवास योजनेत तालुक्यातील विघ्रवली येथे भाजपाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुलजी काळसेकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यांसमोर ठेऊन कार्यान्वित करण्यात आलेल्या अनेक कल्याणकारी योजनांविषयी उपस्थित बूथ पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर संघटनात्मक बाबींवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. गावात घेतलेल्या शासकीय योजनांच्या लाभांचा आढावा घेतला.

विघ्रवली बूथ सक्षम आणि भाजपाप्रणित करण्याच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि महाविजय २०२४ मध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी साधावी अशी विनंती प्रमोद जठार यांनी केली. विघ्रवली येथील भाजपा बूथ प्रमुख श्री. शेखर गुरव, श्री. वसंत इंदुलकर, श्री. रविंद्र गुरव, श्री. आत्माराम गुरव, श्री. गजानन इंदुलकर, श्री. महेंद्र जाधव, श्री. प्रथमेश इंदुलकर, श्री. उदय बोटके, श्री. प्रविण पानकर, श्री. विनायक पालकर, श्री. विश्राम गुरव, श्री. संजय इंदुलकर, सौ. स्वरा गुरव, सौ. प्रणाली गुरव, सौ. सुनीता गुरव, सौ. शेवंती गुरव, सौ. यमुना गुरव आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सोबतच भाजपाचे तालुका, जिल्हा, लोकसभा आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महाविजय २०२४ साठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्याचे ठरवून पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मा. नरेंद्र मोदीजींना विराजमान करण्याचा निर्धार केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page