
वाढीव घरपट्टी प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती
सर्वसामान्य देवरुखवासियांना विश्वासात घेतल्या शिवाय घरपट्टीत वाढ नाही..
देवरुख- देवरुख नगरपंचायतीने नवीन पद्धतीने घरपट्टी आकारणी करत नागरिकाना नोटिस बजावल्या होत्या. यात घरपट्टीमधे सरासरी दुप्पट व तिप्पट वाढ झाली होती. या अचानक झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिकांमधे नाराजी होती.
▪️आज या संदर्भात पालकमंत्री महोदय यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत भेट घेऊन देवरुख वासियांची व्यथा मांडली. पालकमंत्री महोदयांनी तत्काळ त्याची दखल घेत सदर प्रक्रियेस स्थगिती दिली. देवरुख मधील सर्वसामान्य नागरिकाना विश्वासात घेतल्या शिवाय कोणत्याही परिस्थितीत घरपट्टीमधे वाढ करू नये अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
▪️या प्रसंगी देवरुख भाजप शहर अध्यक्ष सुशांत मुळे, भाजप तालुका उपाध्यक्ष महेश धामणस्कर, शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख सनी प्रसादे, आपले देवरुख सुंदर देवरुख ग्रुपचे निमंत्रक हेमंत तांबे, संगमेश्वर तालुका कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष सागर शेट्ये, भाजपा क्रीडा सेल अध्यक्ष दत्ता नार्वेकर, जेष्ठ भाजपा सदस्य सत्यवान बोरूकर, आभास वळवी, जेष्ठ पत्रकार प्रमोद हर्डीकर उपस्थित होते.