
देवरूख- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे माझ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली,माझ्या पाठी मोठ्या ताकदीने उभे राहिले,त्याच पद्धतीने आता कार्यकर्त्यांच्या पाठी मी ठाम उभा राहणार आहे.त्यांच्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. अशा शब्दात भाजप नेते प्रशांत यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जबरदस्त असा विश्वास दिला.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हापरिषद गट व साडवली जिल्हापरिषद गटात कार्यकर्ता संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.कोसूंब गटातील ताम्हाणे येथे पहिली बैठक पार पडली.तर साडवली गटात हातीव येथे बैठकीचे रूपांतर चक्क मेळाव्यात झाले.यावेळी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद आधटराव,जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर,भाजप मंडळ अध्यक्ष रुपेश कदम,सौ.रुपाली रुपेश कदम,हातीव सरपंच नांदुभाई कदम,भाजप अनुसूचित मोर्चा अध्यक्ष प्रकाश जाधव,हातीव गावचे मानकरी,सोशलमीडिया प्रमुख अमोल गायकर,भाजप तालुका उपाध्यक्ष अभिजित सप्रे,दत्ताशेठ लिंगायत,करंबेळे गुरुजी,तेजस शिंदे,सचिन इप्ते,शशांक धामणे,तालुका सरचिटणीस सचिन बंडागळे, चिपळूण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पवार,चिपळूण सरपंच संघटना अध्यक्ष योगेश शिर्के,फैसल पिलपिले तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले मी पूर्ण विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.माझ्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली,अहोरात्र काम करून एक संघर्षमय लढा उभारला त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता आपल्या बरोबर पुढे घेऊन जायचे असेल आणि भविष्यात त्यांना न्याय द्यायचा असेल तर भाजप हाच योग्य पक्ष आहे.हा दूरदृष्टीचा विचार करून मी या पक्षात प्रवेश केला.आणि पक्षात प्रवेश केल्यापासून भाजप नेत्यांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जो सन्मान मला व माझ्या कार्यकर्त्यांना दिला ते पाहता मी योग्य निर्णय घेतला ही माझी ठाम खात्री झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत.त्यांच्या पाठी उभे राहण्याची आता गरज आहे.आणि तीच भूमिका मी घेतली आहे.कार्यकर्त्यांसाठी शेवटापर्यंत लढणार आहे.महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे.परंतु आमच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे यासाठी आम्ही चर्चा करत आहोत.लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल,जर शतप्रतिशत भाजपचा आदेश आला तरी आपली तयारी असली पाहिजे,इतकी भक्कम तयारी ठेवा,पण ज्यावेळी उमेदवारी दिली जाईल त्यावेळी सर्वांनी एक दिलाने,पूर्ण ताकदीनिशी त्या उमेदवारांच्या पाठी उभे राहायचे आहे.असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*