शिवस्वराज्य प्रतिष्ठान डिंगणी, संगमेश्वर प्रतिवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात, आज शिवजयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले. आज आयोजित आरोग्य शिबिराचे फीत कापून उद्घाटन माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा अनेक गरजू लोकांना फायदा झाला.
माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासहित डिंगणीचे प्रभारी सरपंच मिथुन निकम, माजी सरपंच शशी गुरव, मयूर निकम, विशाल निकम, सौ. प्रमिला गुरव, सौ. मधुरा मिथुन निकम, सौ. स्नेहल तळेकर, सौ.संस्कृती चाळके, श्री. विशाल कदम, श्री. विजय खांबे, श्री. पांडुरंग पेजे, श्री. वामन काष्टे, श्री. नारायण गुरव, श्री. सुधीर चाळके, श्री. विकास चाळके, श्री. सूर्यकांत तळेकर, श्री. दीपक चाळके, श्री. विजय गुरव, श्री. जयकुमार चाळके, श्री. भिकाजी नेवरेकर, श्री. चंद्रकांत काजरेकर आदी उपस्थित होते.