भाजपकडून धार्मिक तेढ वाढवण्याचा
प्रयत्न केला जात आहे : नाना पटोले

Spread the love

नागपूर :- गेल्या काही दिवसात राज्यातील घडामोडी पाहता भाजपकडून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत नाहीत हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षण जुन्या सरकारने नाकारलं म्हणता, मग एक वर्षांपासून तुमचं सरकार आहे काय करत आहे ? हिंमत दाखवा, निवडणूकीला पुढे या असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
‘मला माहीत नाही: असं राज्याचे गृहमंत्री यांनी वक्तव्य करणे बालिशपणा आहे. राज्यात करवाई होत असेल तर त्यांना माहीत नाही हे म्हणणं योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे, चाकोरी ठरवून दिली आहे, ९० दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढावे लागतील.
परमबीर सिंह यांच्या आरोपांनी महाराष्ट्राला कलंक लागला. १०० कोटी आणले कुठून हा प्रश्न अनुत्तरित असताना, महविकास आघाडीला बदनामी करण्यासाठी प्यादा म्हणून परमबीर सिंहला वापरले गेले. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याने जो आरोप करून कलंक लावला , त्यात केंद्र किंवा राज्य सरकारने हे करवून घेतले का ? असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. दरम्यान, गृहमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, अधिवेशनात विचारू, अन्यथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page