पदवीधर मतदारांची नोंदणी व पक्षाने निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन.
जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर १०, २०२३.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विधान परिषद सदस्य मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने भाजपा पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री. धनराजजी विसपुते यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याअंतर्गत आज रविवार दि. १० सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील भाजपा पदवीधर प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली. मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंवारबाव येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पदवीधर प्रकोष्ठच्या कार्याचा रत्नागिरी (द.) जिल्ह्यात सर्वदूर विस्तार व्हावा, मोठ्या संख्येने पदवीधर तरुण-तरुणींची नोंद व्हावी आणि पक्षाने निश्चित करून दिलेल्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडाव्यात यासाठी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याचप्रमाणे प्रकोष्ठच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यासाठी तालुका, जि.प. गट, पं.स. गण तसेच शक्तीकेंद्रापर्यंत सक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवाव्यात जेणेकरून आपले कार्य तळागाळापर्यंत ताकदीने पोहचेल असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘महाविजय २०२४’ साठी आपल्या प्रकोष्ठच्या माध्यमातून मोठे काम करावे लागणार आहे याची जाणीव प्रत्येक पदाधिकाऱ्याला आता झाली पाहिजे. असा कानमंत्र त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
छोटेखानी झालेल्या या बैठकीसाठी पदवीधर प्रकोष्ठचे कोकण विभाग संयोजक श्री. सचिन मोरे, ठाणे विभागाचे सहसंयोजक श्री. विरेंद्र यादव, पदवीधर प्रकोष्ठ सामाजिक माध्यम प्रमुख श्री. सिद्धेश गावकर, जिल्हा समन्वयक सौ. नुपूरा मुळ्ये, जिल्हा सहसमन्वयक श्री. राजेश आंबेकर, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव श्री. विक्रम जैन, श्री. अशोक वाडेकर, श्री. दादा ढेकणे, श्री. बाबू सुर्वे, श्री. मंदार खंडकर, श्री. अनिरुद्ध फळणीकर, श्री. सदनलाल चिफा, प्रशालेच्या सौ. नंदा शेलार मॅडम, सौ. जोईल मॅडम, श्री. करवडे सर, सौ. भाग्यश्री राणे मॅडम, सौ. नाईक मॅडम, स्वरूपा पवार मॅडम, श्री. राकेश भोगले सर आदी प्रकोष्ठ पदाधिकारी तसेच प्रदेश व जिल्हा स्तरावरील विविध मोर्चांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.