
फणसट गावचे श्री. सुनिल सागवेकर श्री. सुशांत मुळ्ये यांचा विषेश प्रयत्नातून भाजपमध्ये जाहीर प्रवेश

संगमेश्वर, सचिन बंडागळे – संगमेश्वर तालुक्यातील फणसट गावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री. सुनील सागवेकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आज करण्यात आला.
देशाचे माननीय पंतप्रधान सन्माननीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन माननीय रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश जी सावंत साहेब, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रभारी श्री. प्रमोदजी अधटराव साहेब ,संगमेश्वर दक्षिणचे तालुकाध्यक्ष श्री रुपेशजी कदम साहेब,ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेटे साहेब ,देवरुख शहराध्यक्ष सुशांतजी मुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फणसट गावातील श्री. सुनील सागवेकर, उदय शिंदे, आदिती शिंदे ,अरुण मुळे, किशोर जुवेकर ,अभिजीत कांबळे, संजय शमनाक,व इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
त्याप्रसंगी संगमेश्वर दक्षिण भाजप कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
याप्रसंगी श्री .सुनील सागवेकर यांची फणसट बुथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी श्री सागवेकर यांनी आपण आपल्या गावात व पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिकांचा लवकरच पक्ष प्रवेश करू अशी ग्वाही दिली.



