
🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | कडवई | मार्च १८, २०२३.
🔴 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. निलेश राणे यांचा ४१ वा वाढदिवस काल दि. १७ मार्च रोजी साजरा करण्यात आला. लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्ते आणि निलेश राणे समर्थकांनी सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष (द. रत्नागिरी) श्री. अविनाश गुरव यांनी शालेय विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सुयश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
🔴 “डॉ. निलेश राणे यांच्यासारख्या सर्वसमावेशी नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुरडव येथील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन साहित्य वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद अनुभवता आला. याव्यतिरिक्त काही पालकांनी सन्माननीय निलेश राणे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. या उपक्रमाच्या निमित्ताने आम्हाला घरोघरी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली.” असे अविनाश गुरव यांनी सांगितले. यावेळी भाजपा कार्यकर्ते सुहास केळकर, ग्रामस्थ उत्तेश धामनाक, जयंत शिंदे, अविनाश जाधव, प्रकाश बाटे, दत्ताराम केळकर, राम बाटे आदी उपस्थित होते.