रत्नागिरी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नूतन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या उपस्थितीत आज शनिवार 22 जुलै रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप करून ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्य केले जात आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे सेवा कार्य केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना मोफत फळ वाटप करण्यात आले.
तसेच श्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांच्या सूचनेनुसार राज्यात 50 हजार कार्यकर्ते रुग्णमित्र नियुक्ती आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर,आरोग्य व्यवस्था अश्या विविध कार्यक्रम राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा सिव्हिल सर्जन फुले मॅडम यांची भेट घेतील. व हॉस्पिटल संदर्भात व तेथील सेवा सुविधा याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सेवा देता येईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे राजेश सावंत यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील सेवा सुविधा यांची उपलब्धता रुग्णालयाची स्वच्छता अशा विविध विषयांवरती राजेश सावंत यांनी चर्चा केली. याप्रसंगी
अनिकेत पटवर्धन, सतीश शेवडे, अशोक मयेकर, महेंद्र मयेकर,राजू भालेकर, विवेक सुर्वे, सतेज नलावडे, दादा दळी, संदीप सुर्वे, शिल्पा मराठे, ऐश्वर्या जठार, प्राजक्ता रुमडे भाजप कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा आदी उपस्थित होते.