जत तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्यात सुद्धा दगड घातला. विजय ताड असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी ताड यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घातला. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जतमध्ये भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर विजय ताड गाडीतून उतरल्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी ताड यांच्या गाडीवर आधी गोळीबार केला. गोळीबारानंतर विजय ताड गाडीतून उतरल्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून हत्या केली. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास करत आहे. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page