मा. आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन.
भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे दाखल केली तक्रार.
रत्नागिरी : लोकशाहीचे मंदिर संसद भवनाबाहेर तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे महामहिम उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्याचे चित्रण करीत होते. अशा स्वरूपाचे निंदनीय कृत्य करणाऱ्या इंडी आघाडीच्या नेत्यांचा भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
“तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.” असे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने म्हणाले, “या निमित्ताने काँग्रेसची नियत आणि असुसंस्कृत चेहरा पुन्हा एकदा उघड झाला. इंडी आघाडी वारंवार राष्ट्रीय सन्मान पायदळी तुडवत आहे. २०२४ मध्ये जनता यांची योग्य जागा दाखवेलच पण भाजपा कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्व या कृत्याचा निषेध करत आहोत.” कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून कल्याण बॅनर्जी, राहुल गांधी व इंडी आघाडीचा निषेध केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
मा. आमदार, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने, रत्नागिरी(द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, शहराध्यक्ष श्री. राजन फाळके, मा. जिल्हाध्यक्ष श्री. सचिन वहाळकर यांच्यासहित विविध मोर्चांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.