चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी भाजपने रणशिंग फुंकले; चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुक लढण्यास भाजप आग्रही; कार्यकर्त्यांची एकमुखाने मागणी…

Spread the love

*देवरुख/ संगमेश्वर /प्रतिनिधी-* भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या अनुषंगाने बैठका घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा कार्य करण्याची बैठक घेण्यात आली . त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने इकडून विधानसभेचे बैठक उद्या देवरुख येथे होणार आहे सकाळच्या बैठकीला मधील  तालुक्यातील काय करते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याची बैठक होणार आहे. सदर बैठकीमध्ये चिपळूण तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

*चिपळूण संगमेश्वर विधानसभा मध्ये भाजपला उमेदवारी मिळावी; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भावना-*

भारतीय जनता पार्टी चिपळूण संगमेश्वर विधानसभेतील कार्यकर्ते सात ते आठ वर्ष प्रचंड मेहनत करत आहेत सदरची विधानसभा मिळावी अशी कार्यकर्त्यांची पूर्वीपासूनचे मागणे होते . यापूर्वीही या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज भरण्यात आला होता . पातळीवरून युतीचा निर्णय आल्यामुळे सदरचा अर्ज मागे घेण्यात आला होता . त्यामुळे पूर्वीपासूनच या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे . मागील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होते . त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांची बुथ रचनेपर्यंत फळी मजबूत असल्यामुळे या मतदार संघातून भाजपला उमेदवारी मिळावी; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भावना आहे.

*भाजपचे संगमेश्वर-चिपळूण विधानसभा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा अशी सर्व सामान्य कार्यकर्त्याची इच्छा – क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव…*

भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. सरकारने केलेल्या काम कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या माहिती लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा मोठा सहभाग आहे. तसं काम या मतदारसंघात त गेली पाच वर्षे चालू आहे. भारतीय जनता पार्टी चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे क्षेत्राध्यक्ष जबाबदारी प्रमोद अधटराव यांच्याकडे आहे. गेली तीन वर्षे सतत या विधानसभेमध्ये प्रवास करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतलेले आहेत. काय नाही आजपर्यंत झालेल्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी सदर विधानसभेमधून भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इच्छा प्रगट केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना आहे तीच माझी भावना आहे त्यामुळे विधानसभा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे तशी वरिष्ठांकडे मागणी  केलेले आहे. आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रमोद आढळराव यांनी मागणी केली आहे.

भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष रूपेश कदम, उत्तर मंडल तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये उपस्थित होते.

*भारतीय जनता पार्टी यांच्या पत्रकार परिषद येथील महत्त्वाचे मुद्दे-*

▪️ देवरूखात उद्या होणार भाजप तालुका कार्यकारणीचे अधिवेशन

▪️ २०१४ ची पुनरावृत्ती झाली तर भाजपची स्वबळावर निवडणुक लढण्याची तयारी

▪️ संगमेश्वर तालुक्यातीलच आमदार असावा तोही भाजपचाच असावा ही कार्यकर्त्यांची भावना

▪️ आजपर्यंत चिपळूण तालुक्याला देण्यात आले झुकते माप

▪️ गेली २० वर्षे संगमेश्वर तालुक्यातील आमदार नाही; ही कार्यकर्त्यांच्या मनात खंत

▪️ महायुतीमधून पक्षाला उमेदवारी मिळाली तरी किंवा वेळप्रसंगी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची कार्यकर्त्यांची तयारी

▪️ भाजपचे संगमेश्वर-चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांची पत्रकार परिषदेत माहिती

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page