वाढदिवस विशेष लेख- अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा ,…म्हणजे बने साहेब…..

Spread the love

शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला धार, झटकी पट गोष्टी, नेतृत्वातून तयार होणाऱे कर्तृत्व स्वाभिमानातून मिळणारा अभिमान, पराक्रमातून प्राप्त होणारा आदर्शपणा अशा असंख्य गुणांनी भरगच्च भरलेला व तितकाच तमाम जनतेसाठी प्रशासनाला आपल्या विशिष्ट शैलीत खडसावून रयतेची असंख्य कामे चुटकीसरशी सोडवून आशा व दिलासा‌ देणारा शिवसेनेचा मावळा, निष्ठावंत शिलेदार व अजूनही तेवढाच धडाकेबाज  करारीपणा असलेले माजी आमदार सुभाषशेठ बने होय.

_सह्याद्रीच्या खोऱ्यात, संगमेश्वर तालुक्यातील कुंडी, बेलारी सारख्या अगदी खेडूत भाग हे बने साहेबांचे जन्म ठिकाण. १ जून २०२५ रोजी बने साहेबांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला एक दृष्टीक्षेप…._

खऱ्या अर्थाने आपण *समाजाचं*  काही तरी देणं लागतो, ही भावना मनाशी बाळगून भांडूपसारख्या सुख सोयी ठिकाणाहून सुमारे तीस वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या तालुक्यातील तमाम रयतेची सेवा करावी या उदात्त हेतूने संगमेश्वर तालुका पंचायत समिती सदस्य निवडणुकीसाठी ठाम राहिले. त्यांची राजकारणातील पकड, सडेतोड विचार, संपर्काने वाढवलेला लोक संग्रह, या असंख्य गोष्टींमुळे निवडणुकीसाठी त्यावेळी तिकीट मिळाले व निवडूनही आले.आणि खूप वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर ते संगमेश्वर तालुक्याचे *सभापती* ही झाले.

त्यानंतर खूप वर्षांचा रखडलेला प्रत्येक गावचा विकास होण्याच्या दृष्टीनें त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात आपले *खंदे* कार्यकर्ते तयार केले. व त्यावेळी अशा कार्यकर्त्यांनी आणलेली व मागणी केलेली विकास कामे प्राधान्याने मंजूरी मिळवून करण्याचा सपाटा लावला. व त्यातून तालुक्यात कार्यकर्ते व हितचिंतकांची मजबूत फळी तयार केली.
    
त्यानंतर तालुका सभापती पदाची पाच वर्षे कारकिर्दी संपल्यावर पुढील पाच वर्षांसाठी जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी उभे राहिले. तालुक्यात पाच वर्षांत केलेल्या  विकास कामांमुळे ते निवडून येऊन जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यांचा करारीपणा, धडाकेबाज कामाची पद्धत यामुळे पक्षाने त्यांना *रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष* पदाची जबाबदारी दिली. याही पदाला कुशाग्र बुद्धीने व सडेतोड विचार व बोलण्याने न्याय देऊन जनतेची मागणी नुसार व गरजेची कामे केली.

त्यानंतर पुढची काही वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषद *अध्यक्ष* म्हणून जबाबदारी पक्षाने देऊन त्या पदाचा आपल्या उत्तम कार्याने ठसा उमटवला. व केवळ एका तालुक्याचे सुभाषशेठ बने अख्या रत्नांगिरी जिल्ह्याचे बने साहेब झाले.

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे खासदार मा.श्री. नारायण राणे साहेब यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी असल्याने त्यांना *पणन* या मंडळाचे *उपमुख्य प्रशासक* हे पद मिळाले. पणन सारख्या अत्यंत महत्वाच्या महामंडळा वरती कोणत्याही प्रकारचा विशेष अनुभव नसताना त्याकाळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळवून देण्याचे काम बने साहेबांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

म्हणून त्यानंतर त्यांच्या कामातील आदर्शपणा तसेच  विकास कार्याने जोडलेला लोक संग्रह यामुळे पक्षाने आमदारकीच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले. व त्या निवडणुकीत सहज विजयी होऊन सुभाषशेठ  *आमदार* सुभाष बने साहेब झाले. त्यामुळे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्यावेळी उत्साह शिगेला पोहचला.

पाच वर्षांच्या आमदारकिच्या काळात जनहितासाठी त्यांनी विधानसभेत वेळोवळी आवाज उठवून माझ्या  *मतदार राजासाठी पिण्यायोग्य पाणी, गावोगावी रस्ता, आरोग्य, कृषी तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण* मिळाले पाहिजे यासाठी नेहमीच विधानभवनात आग्रही राहून अशी असंख्य कामे  झालीच पाहिजेत, म्हणून त्यावेळी मंजूरी ही मिळवून पूर्णत्वास नेली आहेत.

सध्या बने साहेब माजी आमदार असले तरीही अजूनही तेवढाच करारीपणा, तितकीच जनतेची सर्व क्षेत्रातील कामे आपल्या *कार्य कर्तृत्व व कौशल्याने* करताना दिसतात. आजही जोडलेल्या कार्यकर्त्यांशी व हितचिंतकांची तेवढेच जवळचे संबंध ठेवून कायम वागतांना दिसतात. त्यांना सर्व क्षेत्रातील प्रशासन अधिकारी, कर्मचारी साहेबांचा आदर राखून जनहितार्थ सांगितलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करतात. हीच कामाची पद्धत खऱ्या अर्थाने लोकांचा लोक नेता म्हणावयास  नक्कीच *साजेसा* ठरतो.हे बोल आजही समाजा समजात ऐकावयास मिळतात, हीच बाब यापुढील नेत्यांना हमखास *अनुकरणीय* ठरेल, यात *तीळमात्र शंका* नाही.

————————-
साहेब आपणास वाढ दिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा…….!
————————-
लेख शब्दांकन…..

श्री. श्रीकृष्ण खातू,धामणी /संगमेश्वर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page