धनगर हे आदिवासी नाहीत: सुशिलकुमार पावरा
रत्नागिरी: राज्य सरकारने धनगर समाजाचा अभ्यास करण्याकरिता नियुक्ती केलेल्या ‘टीस’चा अहवाल जाहीर करावा,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारने धनगर समाजाचा अभ्यास करण्याकरिता टाटा इन्सिटयूट ऑफ सोशल सायन्येस(टीस)मुंबई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. या संस्थेने धनगर समाजाचा अभ्यास करून अहवाल महाराष्ट्र सरकाराकडे सादर केलेला आहे.परंतु,गेली अनेक वर्षे हा अहवाल खितपत पडला आहे. धनगर समाजाच्या काही संघटनांनी मुंबई उच्च न्यालालयात याचिका दाखल करून ते आदिवासी असल्याचा दावा केलेला आहे.या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरु आहे.मुंबई उच्च न्यायालयाचा १२ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने धनगर आरक्षणाबाबतच्या’टीस’चा अहवाल गोपनीय का ठेवता? अशी विचारणा राज्य सरकारला केली आहे.यामध्ये ‘टीस’ने बनवलेला अहवाल महत्वाचा ठरू शकतो.
मुळात: धनगर आदिवासी नाहीत.धनगर,धनगड ही दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच नाही.राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ओरॉंन जमात आहे.तीची पोटजात ‘धांगड’ आहे.धांगड या जमातीची ‘धनगर’ या जातीचा तीळमात्र संबंध नाही.धनगर समाजाला स्वतंत्र ३.५ टक्के आरक्षण आहे.धनगर समाजाला आदिवासींत समावेश करू नये.व राज्य सरकारने ‘टीस’अहवाल जाहीर करावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.