चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रम
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन,कथाकथन, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.मराठी भाषा जागृती व संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. या कार्यक्रमास रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील व लेखक श्री. विलास जी पाटणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते..वाचू आनंदे या व्याख्यानात मराठी साहित्याची परंपरा व साहित्य संपदा यावर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात मराठी भाषा व्यवहारिक भाषा म्हणून वापरली गेली तर तिचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल असे प्रतिपादन ॲड. पाटणे यांनी केले. मराठी साहित्यात योगदान दिलेल्या थोर साहित्यिक व त्यांचे लेखन याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले.मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सलग दोन वर्ष कथाकथन स्पर्धेत उप परिसराचे नेतृत्व करून सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या कु. साक्षी चाळके हिने कथाकथन सादर केले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन एनएसएस कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक यांनी केले.कार्यक्रमाच्या नियोजनात रत्नागिरी उप परिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.
जाहिरात :