बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4)ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालं. एकापेक्षा एक तगडे १६ स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. शंभर दिवसांच्या या प्रवासात अखेरपर्यंत राहिले ते टॉप ५ स्पर्धक. यात राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकरचा समावेश होता. आज रंगलेल्या या रिएलिटी शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने घराबाहेर पडले. त्यानंतर अक्षय आणि अपूर्वामध्ये कोण बाजी मारणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आणि अखेर अक्षय केळकर(Akshay Kelkar)ने या शोमध्ये बाजी मारत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला आहे तर अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ने पटकावले दुसरे स्थान. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर.