चिपळूण मध्ये ठाकरे गटाला खिंडार;
माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांचा शहर प्रमुखपदाचा राजीनामा,शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार

Spread the love


चिपळूण: वैभव वीरकर चिपळूण मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उठाबा शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी शिवसेना शहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे ते ते,शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत
चिपळूण शहराच्या राजकीय वर्तुळात रविवारी सायंकाळी खळबळ उडालीआहे उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरप्रमुख पदासह पक्षाचा राजीनामा आपण शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले.
आजवर शिवसेनेसाठी जिवाचे रान केले कसलीही अपेक्षा न करता पंधरा वर्षे झगडत राहिलो. सातत्याने गळचेपी झाली, तरी काम करीत राहिलो. परंतु आता माझ्या सहकाऱ्यांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून काम करायचे आहे असे सांगत आपण स्वातंत्र्य दिनीशिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे सकपाळ यांना अश्रू अनावर झाले. अश्रू पुसत पुसतच ते बैठकीतून निघून गेले. चिपळूणमधील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणून सकपाळ यांच्याकडे पाहिले जात आहे. गेली पंधरा वर्षे ते शिवसेनेमध्ये कार्यरत होते, परंतु अचानक त्यांनी रविवारी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page