
▪️गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता लवकरच मार्चमधील नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात येणार आहे. सरकारने 28 जिल्ह्यांना एकूण 177 कोटी 80 लाख 61 हजार रूपयांचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई तातडीने जमा करून त्यांना दिलासा देण्याचे शिंदेंनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.