मोठी बातमी ! झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचा भीषण अपघात! सर्व डब्बे रुळावरून घसरून मालगाडीला धडकले…

Spread the love

*हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या रेल्वेचे सर्व डब्बे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले.*

*झारखंड-* हावडा – मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या रेल्वेचे सर्व डब्बे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात २५ हून अधिक नागरिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान झाला.

जमशेदपूर, झारखंड येथे हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान पहाटे ३.४३ वाजता झाला. या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*मालगाडीला धडक-*

मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाल्याच्या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

*अपघातानंतर गोंधळ-*

या अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. पहाटे ३.४३ वाजता रेल्वेच्या बोगी रुळावरून घसरल्या. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, ज्या ट्रॅकवरून एक्स्प्रेस जात होती त्याच्या शेजारी एक मालगाडी उभी होती. बोगी रुळावरून घसरल्या आणि मालगाडीला धडकल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

*जखमींव रुग्णालयात उपचार सुरू-*

या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात नेण्यात येत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*हेल्पलाइन क्रमांक-*

हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस रेल्वे अपघातानंतर रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

टाटानगर: ०६५७२२९०३२४

चक्रधरपूर: ०६५८७ २३८०७२

राउरकेला: ०६६१२५०१०७२, ०६६१२४००२४४

हावडा: ९४३३३५७९२०, ०३३२६३८२२१७

रांची: ०६५१-२७-८७११५

HWH हेल्प डेस्क: ०३३-२६३८२२१७, ९४३३३५७९०२

SHM हेल्प डेस्क: ६२९५५३१४७१, ७५९५०७४४२७

KGP हेल्प डेस्क: ०३२२२-२९३७६४

CSMT हेल्पलाइन ऑटो क्रमांक: ५५९९३

P&T: ०२२-२२६९४०४०

मुंबई: ०२२-२२६९४०४०

नागपूर: ७७५७ ९१२७९०

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page