
इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्त्रायलने गाझी पट्टीतील रुग्णालयही सोडले नाही. रुग्णालयावरील हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारामु्ळे इस्त्रायलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर काल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्त्रायलमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी येथे मोठी घोषणा केली. गाझा आणि वेस्ट बँकमध्ये मानवता मदतीसाठी त्यांनी 100 मिलियन डॉलर्स (832 कोटी रुपये) मदतीची घोषणा केली. यामुळे दहा लाखांहून अधिक विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मदत मिळेल.
अमेरिकेलाही युद्धाचा फटका! लेबनॉनमध्ये जमावाने US दूतावास जाळला..

असोसिएटेड पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गाझा भागातील अल अहरी या रुग्णालयावर हवाई हल्ला करण्यात आला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी रुग्ण आणि पॅलेस्टिनी नागरिक आश्रयास होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. मृतदेह सर्वत्र विखुरल्याचेही दिसत आहे. पॅलेस्टाइनने या हल्ल्याची खात्री केली आहे. इस्त्रायली विमानांनी गाझातील अल अहली हॉस्पिटलवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

बायडेन यांनी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी ट्विट करत हमासवर घणाघाती टीका केली. हमास बहुसंख्य पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाही. इस्त्रायली लोकांच्या धैर्य, शौर्याचा सन्मान करण्यासाठी मला इस्त्रायलमध्ये असल्याचा अभिमान आहे. इजिप्तच्या माध्यमातून गाझातील सामान्य नागरिकांना औषधांचा पुरवठा केला जाईल. यामध्ये इस्त्रायलही मदत करील, असे बायडेन म्हणाले.
इस्त्रायल- हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील किम डोकरकर भारतीय महिलेसोबत आणखी 2 महिलेचा मृत्यू..
गाझातील नागरिकांना इस्त्रायल करणार मदत..
युद्ध सुरू झाल्यापासून गाझातील अन्न पुरवठा पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे येथील लोकांची उपासमार होत आहे. डोक्यावर छत नाही, पाणी नाही, रुग्णालयात औषधं नाहीत, कुठेही वीज नाही, इंधन नाही अशा भीषण परिस्थितीत येथील नागरिक दिवस काढत आहेत. त्यामुळे बायडेन यांनी इस्त्रायललाच ही मदत देण्यास सांगितले आहे. त्याला इस्त्रायलनेही सहमती दर्शवली आहे. सुरक्षित मार्गाने गाझा पट्टीतल्या नागरिकांना अन्न, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.