रत्नागिरीतील आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे पुलाजवळ मत्स्यगंधा एक्सप्रेसची धडक बसून बिबट्याचा मृत्यू…

Spread the love

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे पुलाजवळ मत्स्यगंधा एक्सप्रेसची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबईकडून मडगावच्या दिशेने धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडी क्रमांक 12619 येथील आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे पुला जवळ बिबट्या जातीचा वन्य प्राणी रेल्वे ट्रॅकवर आडवा आल्याने रेल्वेची धडक बसून मृत झाला त्याबाबतची माहिती पृथ्वीराज चव्हाण रेल्वे पोलीस रत्नागिरी यांनी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना दिली त्यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे तात्काळ स्टाफसह रात्री 11:00 च्या दरम्यान जागेवर जाऊन खात्री करता सदरचा मृत बिबट्या ट्रॅकच्या शेजारी पडलेला दिसून आला त्याची  पाहणी केली असता त्याची मान धडा वेगळी झालेली असून खालील जबडा तुटलेला  व उजवा डोळा बाहेर आलेला दिसून आला सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून तो सुमारे दोन ते तीन वर्ष वयाच्या असल्याचे दिसून येत आहे सदर बिबट्याला सदर मृत बिबट्याला ताब्यात घेतले व माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण )श्रीमती गिरीजा देसाई सहायक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांना माहिती दिली.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांचेकडून शव विच्छेदन करून घेऊन बिबट्याचे मृत शरीर सर्व अवयवसहित जाळून नष्ट करण्यात आलेले आहेत यावेळी रेल्वे पोलीस विभागाचे सतीश विधाते पीआयआरपीएफ, आर एस चव्हाण ए एस आय, प्रवीण कांबळे कॉन्स्टेबल अमर मुकादम कमलेश पाल व्ही एस पवार निसर्ग प्रेमी  रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक रत्नागिरी शर्वरी कदम उपस्थित होते. सदर रेस्क्यू ची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली  अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई यांनी केलेले आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page