
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलताना आपल्या राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगितले आहेत. शिवसेना का सोडावी लागली, बाळासाहेब ठाकरे आणि आपल्यात का दरी निर्माण झाली यावर देखील ते बोलले आहेत.
‘…अन् तिथूनच आमच्यात दरी निर्माण झाली’, भुजबळांनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा…
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलताना आपल्या राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगितले आहेत. शिवसेना का सोडावी लागली, बाळासाहेब ठाकरे आणि आपल्यात का दरी निर्माण झाली यावर देखील ते बोलले आहेत. तसेच ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना यावर बोलताना देखील त्यांनी परखड शब्दात आपलं मत मांडलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?…
वसंत व्याख्यानमालेचंं 102 वं वर्ष सुरू आहे, मी अगोदर या ठिकाणी येऊन गेलो आहे. आजही मला या ठिकाणी यायला जमले. आता कोणत्या लढाया लढायच्या पावसाबरोबर? सरकार बरोबर की न्यायालयाबरोबर? असा खोचक सवाल यावेळी भुजबळ यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आणि जातनिहाय जनगणना हे दोन मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, या सगळ्या ओबीसी वर्गाला, महिला वर्गाला, दलीत वर्गाला, आदिवासी वर्गाला पहिली ओळख मिळून दिली ती म्हणजे महात्मा फुले यांनी. ब्राह्मण समाजात फक्त पुरुष शिकत होते, महिला शिकत नव्हत्या, अनेक गोष्टींचा बाह्मण महिलांना त्रास होत होता, त्याविरोधात फुले यांनी लढा दिला, आंदोलन उभारलं.
शेतकरी , गोरगरीब यांना काही समजत नव्हते, काही झाले तर तक्रार कोणाकडे करणार सगळे एकाच समाजाचे लोक आहेत, त्रास दोणारा तोच, तक्रार लिहिणारा आणि न्याय देणाराही तोच. सगळया जाती त्याच्या उद्योग धंद्यावरून पडल्या आहेत. ओबीसीला प्रत्येकवेळी काही देण्याचं ठरलं तर हे कोर्टात जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील ओबीसी कमिटी स्थापन केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी आरक्षणाची मागणी होती.
त्यानंतर जनता पार्टीचे सरकार आले, देसाई यांनी आयोग स्थापन करण्यास सांगितला. 1980 साली रिपोर्ट आला, ओबीसीला आरक्षणाची गरज असल्याचं त्यात म्हटलं होतं. पण काँग्रेसच्या काळात हा अहवाल दाबून ठेवण्यात आला. व्ही. पी. सिंग आले त्यांनी सांगितलं हा अहवाला मी स्वीकारत आहे. मी सुद्धा ओबीसी आरक्षणावर बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा मी शिवसेनेत होतो. आम्ही आरक्षणाचा आग्रह धरला होता. नाशिकमध्ये बाळासाहेबर ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह यायचे. ते इथे राहात होते. मी मोर्चात असताना बाळासाहेब ठाकरे माझ्या घरी प्रेस घेत होते. त्यांनी म्हटलं, हा विषय पुढे आणायचा नाही, तिथूनच आमच्यात दरी निर्माण होण्यास सुरुवात झाली असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.