
जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड | मार्च ३१, २०२३.
भांबेड जि.प. गटातील गुरववाडी नं. २ चा मागील ६ वर्षे रस्त्याच्या कामासाठी सुरू असणारा संघर्ष आज खर्या अर्थाने समाप्त झाला. हा रस्ता मंजूर करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक माध्यमांतून प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नव्हते. ९ महिन्यांपूर्वी आलेल्या युती सरकारच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सौ. राजश्री ऊर्फ उल्का विश्वासराव यांनी या रस्त्यासाठी तब्बल ५ लाख रूपये निधी प्राप्त केला आहे. याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज भाजपा उद्योग आघाडी महिला समितीच्या कोकण विभाग सहप्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांच्यासोबत भाजपा लांजा तालुकाध्यक्ष श्री. महेश ऊर्फ मुन्नाशेठ खामकर, तालुका उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, ओबीसी तालुकाध्यक्ष श्री. दादा भिडे, मा. जि. प. सदस्य श्री. अमोल रेडीज, श्री. राणे बुवा, भांबेड जि. प.चे प्रभारी श्री. महेश इंदुलकर, गुरववाडीचे गावकर श्री. चंद्रकांत धकटू गुरव व श्री. राजाराम देवजी गुरव, श्री. कमलाकर शिवगण, श्री. सचिन शिवगण, श्री. शंकरशेठ गांधी, श्री. महेश गांगण, श्री. संदेश गुरव, शक्तीकेंद्रप्रमुख श्री. प्रमोद गुरव, बूथप्रमुख अतुल गुरव, माजी उपसरपंच श्री. प्रमोद (बाबू) गुरव आदी मान्यवर मंडळींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आत्तापर्यंत पूर्व लांजा भागात जवळपास साडेतेरा कोटी रूपयांचा निधी सौ. विश्वासराव यांनी खेचून आणला आहे.
ग्रामस्थांना संबोधित करताना सौ. विश्वासराव म्हणाल्या, “आजचा हा कार्यक्रम म्हणजे नव्या विकास पर्वाचा शुभारंभ आहे. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे भांबेड गुरववाडी नं. २ कडे जाणार्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज ३१ मार्च रोजी संपन्न झाला. मी खात्री देते या रस्त्याचे लोकार्पणदेखील लवकरच होईल. काम गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकाळ टिकेल. शिवाय ग्रामस्थांना उचित लाभ घेता येईल. अशीच अनेक विकासकामे आगामी काळात आपल्याला करायची आहेत. ग्रामस्थांच्या विश्वासाने आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आपण नक्कीच भरीव कार्य करून आपल्या जि. प. गटात विकास प्रवाहित करू.”