भाजपा नेते प्रमोद अधटराव, युवा मोर्चा निवडणूक प्रमुख अविनाश गुरव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, प्रशांत रानडे, महिला तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे आदी मान्यवर उपस्थित.
जनशक्तीचा दबाव न्यूज | माखजन | डिसेंबर १०, २०२३.
भाजपाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यात विकास कामांच्या भूमिपूजन समारंभांचा धडाका सुरु आहे. काल आंबव पोंक्षे येथील घडशीवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजपा नेते, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपला आनंद फटाक्यांची आतिषबाजी व्यक्त करून व्यक्त केला. याशिवाय उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करून आसमंत दणाणून सोडला.
यावेळी श्री. प्रमोद अधटराव यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे नेते मा. मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी तब्बल ५० कोटींहून अधिक विकास निधी प्राप्त झाला आहे. यामुळे गावागावांमध्ये विकास प्रवाहित होणार आहे. राज्यातील सरकार सक्षमपणे पाठीशी उभे आहे तर केंद्र सरकार कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आता कोकणी माणसाने निर्णय घेऊन आपला मार्ग निवडायचा आहे. कारण मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे तर या विकासयात्रेत कोकण मागे राहणार का? याचे आत्मचिंतन सुजाण नागरिकांनी केले आहे. २०२४ ला पुन्हा एकदा मा. मोदीजी पंतप्रधान होतील त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाणीवर उभा असलेला नेता आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत जाईल यासाठी सर्वांनी बहुमुल्य योगदान द्यावे एवढीच विनंती.”
या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा निवडणूक प्रमुख अविनाश गुरव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, प्रशांत रानडे, शैलेंद्र धामणस्कर, महिला तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सरिता आंबेकर, तालुका सोशल मिडिया संयोजक मयुरेश मादुस्कर, तालुका महिला मोर्चा कोषाध्यक्षा सुशीला कातकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश (बावा) जड्यार, महेंद्र (पप्पू) पकडे, गणेश साठे, जितू चव्हाण, सुधाकर घडशी, सरपंच जनार्दन कातकर, गोटेकर काका आदी मान्यवर उपस्थित होते.