
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | एप्रिल १७, २०२३.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत पिरंदवणेच्या कार्यक्षेत्रात गुरववाडी येथे पाखाडीच्या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. आज सकाळी ११:०० वाजता सरपंच श्री. विश्वास घेवडे यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसांत आत्तापर्यंत चिखलातून चालत शाळेत जावे लागत होते. मात्र वॉर्ड क्र. २ चे सदस्य श्री. गजानन गुरव यांनी ही समस्या ओळखून त्यादृष्टीने पावले उचलली आणि ग्रामपंचायतीने त्यांना योग्य सहकार्य केल्याने आज या कामाची मंजुरी मिळाली त्याबद्दल ग्रामस्थांनी श्री. गुरव व ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

या कामी ग्रामपंचायत पिरंदवणेच्या ग्रामसेविका सौ. माया गुरखे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत कामाचा पाठपुरावा केला. हे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल हे मात्र नक्की. या भूमिपूजनासाठी सरपंच श्री. विश्वास घेवडे, माजी सरपंच सौ. माधवी गुरव, माजी उपसरपंच श्री. सदानंद लिंगायत, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, ग्रा.पं. सदस्य श्री. गजानन गुरव, श्री. प्रकाश गमरे, गावकर श्री. चंद्रकांत धोपट, श्री. योगेश मुळे, श्री. हरिश्चंद्र गुरव, श्री. प्रकाश गुरव, श्री. दिलीप गुरव, श्री. प्रमोद जांभळे, श्री. हरेश गुरव तसेच ग्रा.पं. कर्मचारी श्री. संतोष गुरव आदी उपस्थित होते.