रत्नागिरी; महाराष्ट्र शासन व कोकण रेल्वेत झालेल्या MOU नुसार कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख स्थानकांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्यांचे काॅन्क्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी सां.बां.विभागाने घेतली असून त्या साठी महाराष्ट्र शासनाने ६५ कोटींची तरतूद या पुर्वीच अर्थसंकल्पात केलेली आहे. राज्याचे सां.बां.मंत्री मा. रवींद्र चव्हाण यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. आता मंगळवार दि. ८ ऑगस्ट ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व सां.बां.मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहातून सकाळी १०.३० ला व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे हा कार्यक्रम होणार असून स्थानिक सा. बां.विभागातर्फे या बारा स्थानकांवर सदर कार्यक्रम केला जाईल. रत्नागिरीजिल्ह्यातील खेड,चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी,राजापूर या पाच स्थानकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच व रायगड मधील दोन स्थानकांचा यात समावेश असेल.पुढील दहा वर्षे या रस्त्यांची देखभाल सां.बां.विभाग करणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी कोकण रेल्वेमहामंडाळाची आर्थिक तोटय़ातील स्थिती व रस्त्यांची झालेली दुरावस्था याचा विचार करून राज्य शासनाने यासाठी निधी द्यावा अशी विनंती नामदार रविन्द्र चव्हाण यांना केली होती. कोकण चे सुपुत्र व सिंधुदुर्गचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कोकणसाठी खास बाब म्हणून ही काम केल्याने रेल्वे प्रवासीवर्गाकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
जाहिरात
जाहिरात