फणसट येथील भोगले बंधूनी दिला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर…

Spread the love

▪️फणसट (ता संगमेश्वर) येथील जयदेश जयराम भोगले आणि योगेश जयराम भोगले हे बंधू नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई मीरा रोड येथे राहतात. परंतु आपल्या मूळ गावासाठी सतत काहीनाकाही समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. यावेळी गावाला देवदिवाळीच्या पूर्व दिनी गावात वार्षिक पूजेसाठी हे बंधू आले व येतांना त्यांनी गावातील गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे उपकरण भेट करण्यासाठी आणले.

▪️तत्पूर्वी काही दिवस अगोदर त्यांची भेट देवरूख भाजप अध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांच्याशी झाली व चर्चेनंतर त्यांनी ते मशीन देवरुखमधील रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या रुग्ण सहाय्यता केंद्राला देण्याचे ठरले जेणेकरून फणसट बरोबरच तालुक्यातील अन्य गरीब रुग्णांना गरजेच्या वेळी त्याचा उपयोग होईल.

▪️श्री. जयदेश भोगले हे फणसट गावातील जि.प.च्या प्राथमिक शाळेला देखील कायम देणगी देत असतात. यावेळी ऑक्सिजन उपकरण ग्रामदेवता श्री देवी नवलाई ग्राम मंदिरात सत्यनारायण पूजेला फणसट ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. सुशांत मुळ्ये यांच्याकडे जनकल्याण समितीसाठी सुपूर्त केला.

▪️श्री. मुळ्ये यांनी हा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देवरुखमधील जनकल्याण समिती आरोग्य विभागाचे श्री. महेश्वर लिमये, सौ. नेहाताई जोशी यांच्याकडे श्री. शंकर मालप व श्री. शंकर पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्त केला. श्री. भोगले बंधू यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल सौ. नेहा व श्री. लिमये यांनी आभार मानले व जास्तीत जास्त गरजू रुग्णांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Author


Spread the love

You cannot copy content of this page