
ठाणे :- भिवंडीच्या पडघामधल्या ATSच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा झाला. नाचन परिवारानं स्लिपर सेल तयार केल्याची माहिती समोर आली आहे. . स्लिपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम सुरु होतं. एवढच नाहीतर यासाठी १५ तरुणांना जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या दहशतवादी साकिब नाचनच्या घराची एटीएस आणि ठाणे पोलिसांनी झाडाझडती घेण्यात आली.
भिवंडी तालुक्यातील पडघाच्या बोरिवली गावात दहशतवादी साकिब नाचनच्या घरावर महाराष्ट्र एटीएसनं सोमवारी छापा टाकला. भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं मध्यरात्रीनंतर हा छापा टाकण्यात आला, त्यानंतर अनेक धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. ISIS च्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरु केले होते. नाचण परिवाराने स्लिपर सेल तयार केला होता.
भारता विरोधात देशविघातक कृत्य करण्याकरता स्लिपर सेल तयार केला होता. स्लिपर सेलच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम स्लिपर सेल करायचा. हा स्लिपर सेल म्हणजे एक प्रकारे शरीयत ए अल शाम कायद्यानुसार काम करत होचा. मंत्रिमंडळ तयार केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. याकरता १५ तरुणांना जबाबदारी दिली होती . ज्यांना एखाद्या देशाच्या मंत्र्यांप्रमाणे अधिकार दिले होते अशी गोपनीय माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. वेगळा देश म्हणून बोरीवली भागाला या शरीयत ए अल शाम काद्यानुसार घोषीत केले होते अशी गोपनीय माहिती देखील तपास यंत्रणांना मिळाली आहे.
याप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापे मारले. त्या छाप्यात दहशतवाद्यांचा भांडाफोड करत पडघा गावातून १५ जणांना अटक करण्यात आली. ज्यात साकिब नाचणसह त्याचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचणचाही समावेश होता.