मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर…
जनशक्तीचा दबाव न्यूज | भिवंडी | मे ०१, २०२३.
भिवंडीतल्या वळपाडा परिसरात ५ मजली इमारत कोसळून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २२ जणांपैकी १४ जणांना बाहेर काढण्यात आलं असून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.
इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (२), ३३७, ३३८ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.