
*रत्नागिरी:* मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील हायस्कूलच्या तीव्र उतारावर ट्रेलरने दुचाकीस्वाराला उडवल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवम गोताड
शिवम रवींद्र गोताड (20, झरेवाडी, रत्नागिरी), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या मागे बसलेला निशांत कळंबटे (20, झरेवाडी, रत्नागिरी) या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. ट्रेलरने आणखी ३ दुचाकी आणि दोन कारला धडक दिली असून ४ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. हे दोघेही आयटीआय रत्नागिरी येथे शिक्षण घेत होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रेलरने उडवले.

सविस्तर वृत्त असे की, शिवम गोताड आणि निशांत कळंबटे हे दोघे रत्नागिरी आयटीआय येथे शिक्षण घेत आहे. बुधवारी सायंकाळी दोघेही दुचाकीवरून झरेवाडीकडे जात होते. हातखंबा येथील हायस्कूलसमोरील तीव्र उतारावर मागाहून आलेल्या ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गोताड याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये गोताड जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेल्या निशांत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपस्थितांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एवढेच नव्हे तर गोंधळलेल्या ट्रेलर चालकाने पुढे आणखी ३ ते ४ दुचाकींना धडक देत 2 कारलाही धडक दिली. यामध्ये ४ जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत एक मार्गे सुरु केली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर


