संगमेश्वर- भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (उत्तर) तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी शेनवडे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश चांदे यांची निवड करण्यात आली आहे.भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत,संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव,तालुका अध्यक्ष (उत्तर) श्री विनोद मस्के तसेच कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी माझ्या पक्षवाढीच्या कामातून सार्थ ठरवेन असा विश्वास यावेळी बोलताना सुरेश चांदे यांनी व्यक्त केला.
आज तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या वॉरियर्स भेट दौऱ्या दरम्यान तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरेश चांदे यांचा लोकसभा बूथ संयोजक अनीलजी घोसाळकर यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष श्री विनोद म्हस्के,तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश चांदे,मयुर लिंबुकर,नरेंद्र गुरव उपस्थित होते.