दिवा (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्यावतीने येत्या 30 मार्च रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचा रामनवमी सोहळा धुमधडाक्यात साजरा होणार असून यानिमित्ताने प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणुक काढण्यात येणार आहे.पारंपारिक वेशभुषा,भगवे वस्त्र परिधान करुन जय श्रीराम अश्या घोषणा देवून परिसर भगवेमग करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.यावेळी विधीवत पुजा अर्चा केली जाते.
यानिमीत्ताने भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्यावतीने श्रीराम नवमी भव्यदिव्य अशी साजरी करण्यात येणार आहे.30 मार्च 2023 रोजी सायं.4 वाजता प्रभु श्रीरामचंद्रांची भव्य मिरवणुक विठ्ठल मंदीर साबे गावे येथून काढण्यात येणार आहे.तसेच संध्याखाली गणपती मंदीर,गणेश नगर येथे महाआरती होणार आहे. या मिरवणुकीत आमदार श्री संजय केळकर,आमदार व ठाणे जिल्हाध्यक्ष श्री निरंजन डावखरे आदी भाजपचे नेतृत्व सामिल होणार आहे.या मिरवणुकीचा मार्ग साबेगाव ते विठ्ठल मंदिर स्टेशन रोड,दिवा टर्निंग ते दिवा आगासन रोड,गणेश नगर ते गणेश मंदिर असा असणार आहे.
यानिमित्ताने हा सोहळा अधिक भक्तीमय वातावरणात पार पडावा यासाठी भारतीय जनता पार्टी दिवा शहर विशेष मेहनत घेत असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे.